Paytm ऍप वालेट कसे वापरावे – How to use Paytm Wallet

Last updated on April 29, 2017 Published by

मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी नोटबंदी जाहिर केल्यानंतर, डिजिटल क्रांतीला पाठिंबा देत, PAYTM, MOBIKWIK, FREECHARGE या सारख्या कंपन्यानी डिजिटल अथवा इ वॉलेट सामान्य जनतेला उपलब्ध करून दिले.

How to use Paytm wallet

खरंतर इ वॉलेट या आधी पासूनच वापरात होती, पण क्वचितच लोक इ वॉलेटचा वापर करायची. नोटेची कमतरता आणि बँकेची मोठी रांग बघता इ वॉलेट वापरणे लोकांना सोपे वाटू लागले. यामुळे छोटे व्यवसाय करणारे, भाजी विक्रेते, हॉटेल्स, दुग्धालय आणि ईतर किरकोळ विक्रेते यांच्याशी देवाण घेवाण करणे सोपे झाले. See How to use Paytm wallet.

PAYTM इ वॉलेट ईतर वॉलेट पैकी सर्वाधिक प्रचलित वॉलेट आहे. त्याचा वापर करून देवाण घेवाण कशी करावी हे आपण येथे जाणून घेवूया.

Paytm वॉलेट कसे वापरावे How to use Paytm wallet

 1. सर्वप्रथम आपल्या स्मार्टफोन मध्ये Paytm चे ऍप android play store, apple app store अथवा paytm च्या वेबसाईट वरून डाउनलोड करा आणि इन्स्टॉल करा.
 2. त्यानंतर ऍपवर तुम्हाला login आणि register विषयी स्क्रीन दिसेल.
 3. आपले अकाऊंट जर आधीच नोंदवले असेल तर आपल्या युजरनेम आणि पासवर्ड वापरून ऍप मध्ये login करा आणि जर तुम्ही नवे उपभोक्ता (user) असाल तर आपण आपला ईमेल आयडी अथवा मोबाईल नंबर वापरून आपले खाते नोंदवा.
 4. खाते यशस्वीरित्या नोंदवल्यानंतर, ऍप वर login करा.
 5. सर्व प्रथम इ वॉलेट नेट बँकिंग, क्रेडीट अथवा डेबिट कार्ड द्वारे पैसे जमा करा.
 6. तुम्ही इ वॉलेट मध्ये जमा केलेले पैसे तुम्ही Paytm वर शॉपिंग साठी सुद्धा करू शकता. त्या वर  Paytm चे खास Cashback कुपन्स सुद्धा उपलब्ध असतात.
 7. जर तुम्हाला कुणाला पैसे पाठवायचे असतील तर त्या समोरच्या व्यक्ती जवळ सुद्धा Paytm चे अकाऊंट असायला हवे. फोन नंबर अथवा समोरच्या व्यक्ती जवळील असलेला QR कोड स्कॅन करून तुम्ही त्याला पैसे पाठवू शकता.
 8. अगदी त्याच पद्धतीने तुम्ही समोरील व्यक्ती जवळून पैसे घेऊ शकता. तुमचा फोन नंबर अथवा QR कोड स्कॅन करून पैसे तुमच्या Paytm अकाऊंट ला जमा होतील.
 9. Paytm अकाऊंट ला जमा झालेली रक्कम तुम्ही तुमच्या बँक अकाऊंट मध्ये टाकू शकता.
 10. paytm अकाऊंट ला तुम्ही दर महिन्याला जास्तीत जास्त २०,००० रुपये पर्यंत देवाण घेवाण करू शकता.
 11. Paytm KYC (Know Your Customer) फॉर्म भरल्यानंतर १,००,००० रुपये पर्यंत अकाऊंट ला ठेवू शकता’ आणि’ २५,००० रुपये पर्यंत रक्कम बँकेत जमा करू शकता.
 12. अधिक माहिती करिता Paytm च्या FAQ सेक्शन ला भेट द्या अथवा कस्टमर केअर संपर्क साधा.

ह्या पोस्ट मध्ये आपण Paytm ला register करून पैश्याची देवाण घेवाण कशी करायची हे शिकलोय. पुढच्या पोस्टला आपण Mobikwik आणि Freecharge बद्दल जाणून घेवूया.

Tags: , , , , , , , , , , , , , , , , , ,

LEAVE A REPLY

Your email address will not be published. Required fields are marked *

one × 4 =